Saturday 27 May 2017

मात्राहार म्हणजे काय? - आयुर्वेदाच्या चष्म्यातून.


आपल्या शरीराचे मनाचे स्वास्थ्य हे आपण काय,कसे किती खातो यावर अवलंबून असते. म्हणजेच स्वस्थ, विकाररहित शरीर मनासाठी आहार हा सर्वात महत्वाचा घटक आहे.
आयुर्वेदाने या आहाराची महती पाच हजार वर्षांपूर्वीच जाणली होती म्हणूनच आहाराचा समावेश निद्रा ब्रह्मचर्य यांच्यासोबत त्रयोस्तंभात ( म्हणजेच निरोगी आयुष्यासाठी आवश्यक तीन स्तंभ/घटक ) केलेला आहे.

आहार काय असावा?
व्याख्या - आपण जे भक्षण करतो ( आहरण करतो ) त्याला आहार म्हणतात.
निसर्ग हा पंचभौतिक तत्वांनी बनलेला आहे तसेच आपले शरीरदेखील. म्हणूनच आहार देखील पंचभौतिक तत्वांनी युक्त असावा, म्हणजे तो शरीरात योग्यप्रकारे शोषला जाईल शरीर मनाची निरोगी जडघडण होईल.

Sunday 14 May 2017

आरोग्यासाठी सोप्पे उपाय - आयुर्वेदातून आरोग्याकडे

१) जेवणास बसण्यापूर्वी हात पाय तोंड स्वच्छ धुवून पुसून घ्यावे.

२) कडकडून भूक लागलेली असतानाच जेवावे. उगीच वेळ झालीये म्हणून जेवण्यास बसू नये. तसेच पोटास तडस लागेपर्यंत जेवू नये.

३) जेवणाचा व स्वयंपाकाचा परिसर कायम स्वच्छ असावा. जेवताना मन प्रसन्न व आनंदी ठेवावे. tv कॉम्प्युटर, समोर बसून जेवण करू नये अशावेळी आपण किती खात आहोत याचा अंदाज येत नाही व बरेचदा अतिमात्रेत खाल्ले जाते.

४) शक्यतोवर ताजे बनवलेले जेवण घ्यावे. जेवण बनवल्यानंतर ३ तासांच्या आत जेवावे, म्हणजेच फ्रीझ मध्ये ठेवून गार केलेले अन्न जेवू नये. ऑफिस च्या वेळा व वेळेअभावी पूर्णवेळ शक्य नसेल तरी किमान न्याहारी (ब्रेकफास्ट) व रात्रीचे जेवण (डिनर) तरी या नियमानुसार घ्यावे.

५) जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात.विरुद्धान्न ( http://www.ayurbeej.in/2017/04/blog-post.html) डीप फ्रीझ अन्न, prepacked फळे किंवा अन्नपदार्थ खाऊ नये.

६) शक्य असलेली फळे कापून न खाता शक्यतोवर सालीसकट चावून चावून खावी. कापताना काही प्रमाणात त्यातील पोषकतत्वे नष्ट होतात. तसेच फळे, भाज्या कापून फ्रीझ मध्ये ठेवून देऊ नये, यामुळे देखील त्यातील पोषकांश नष्ट होतो.

Friday 5 May 2017

आयुर्वेदानुसार सर्व आजारांचं मूळ – आम


खुप औषधोपचार, वेगवेगळया प्रकारच्या चिकित्सा घेऊनही बरेचदा आजार हे थोड्या कालावधीनंतर परत डोके वर काढतात.औषधोपचारानंतर तेवढ्यापुरता आराम वाटून परत वातावरणातील थोड्याशा बदलाने किंवा खाण्यापिण्याच्या बदलाने पुन्हा त्रास होण्यास सुरुवात होते.

कधी कधी तर आजारी नसतानाही अंग गळुन गेल्यासारखे, थकल्यासारखे, शरीर जड असल्यासारखे वाटते. उत्साह वाटत नाही, शौचास साफ होत नाही, तोंडाला चव लागत नाही,अशाप्रकारची छोटी छोटी लक्षणे व्यवहारात अनुभवली जातात, पण त्याकडे दुर्लक्ष देखील केले जाते.

हीच छोटी छोटी लक्षणे आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष देऊन त्याची नीट हवी तशी काळजी घेण्याची गरज आहे हे सांगणाऱ्या सूचनाच असतात.पण आपण त्यांकडे दुर्लक्ष करून शरीराची व पर्यायाने आरोग्याची हेळसांड करतो व नंतर मोठ्या चिवट आजारांना बळी पडतो.