Saturday, 27 May 2017

मात्राहार म्हणजे काय? - आयुर्वेदाच्या चष्म्यातून.


आपल्या शरीराचे मनाचे स्वास्थ्य हे आपण काय,कसे किती खातो यावर अवलंबून असते. म्हणजेच स्वस्थ, विकाररहित शरीर मनासाठी आहार हा सर्वात महत्वाचा घटक आहे.
आयुर्वेदाने या आहाराची महती पाच हजार वर्षांपूर्वीच जाणली होती म्हणूनच आहाराचा समावेश निद्रा ब्रह्मचर्य यांच्यासोबत त्रयोस्तंभात ( म्हणजेच निरोगी आयुष्यासाठी आवश्यक तीन स्तंभ/घटक ) केलेला आहे.

आहार काय असावा?
व्याख्या - आपण जे भक्षण करतो ( आहरण करतो ) त्याला आहार म्हणतात.
निसर्ग हा पंचभौतिक तत्वांनी बनलेला आहे तसेच आपले शरीरदेखील. म्हणूनच आहार देखील पंचभौतिक तत्वांनी युक्त असावा, म्हणजे तो शरीरात योग्यप्रकारे शोषला जाईल शरीर मनाची निरोगी जडघडण होईल.


आहार कसा घ्यावा?
आयुर्वेदाने आहार षड्रसयुक्त घ्यावा असे सांगितले आहे. म्हणजेच मधुर (गोड),अम्ल(आंबट),लवण(खारट),कटु(तिखट ),तिक्त(कडू),कषाय (तुरट ), या सहा रसांचा आपल्या आहारात नित्य समावेश असावा.
याबरोबरच षड्रसयुक्त आहाराचा सेवनक्रम देखील आयुर्वेदाने सांगून ठेवलेला आहे.
- जेवताना प्रथम मधुर (गोड ) रसाचे सेवन करावे. यामुळे वात ( vata link ) पित्ताचे (pitta link ) संतुलन होते. तसेच मधुर रस हा जिभेसाठी आल्हाददायक असतो त्यामुळे लाळेचे स्रवण होते पचनास मदत होते.
- त्यानंतर अम्ल (आंबट) लवण (खारट) रसयुक्त पदार्थ घ्यावेत यामुळे आमाशयातील पाचक स्रावांचे (gastric juices ) योग्य स्रवण होऊन पचन उत्तम होते.
- सगळ्यात शेवटी कटु (तिखट) कषाय(तुरट) रसाचे पदार्थ घ्यावेत यामुळे कफाचे (kapha link ) योग्य संतुलन होते.

आहार किती घ्यावा?
अति खाण्याने खाण्याने देखील आजार होतात. मग खावे तरी किती? आयुर्वेदानुसार प्रत्येकाच्या आहाराचे प्रमाण हे त्याच्या जाठराग्नीच्या शक्तीवर (पचनशक्तीवर) अवलंबून असते.
आयुर्वेद मात्राहाराचा पुरस्कर्ता आहे.

मात्राहार लक्षण -

" यावदस्याशनमशितमनुपहृत्य प्रकृती यथाकालं जरा
गच्छति तावदस्य मात्राप्रमाणं वेदितव्य भवति '' || || .सु.
(http://www.ayurbeej.in/2016/02/aahar-diet-through-eyes-of-ayurveda.html#more)

याचा अर्थ असा कि जितके अन्न सेवन केले असता एखाद्याच्या प्रकृतीस अपाय करीत योग्य काळी पचते तितके अन्न त्याच्या आहाराची मात्रा म्हणजेच प्रमाण आहे असे समजावे.
यानुसार रोजच्या आहाराच्या मात्रेचे विभाजन पुढीलप्रमाणे केले आहे.
पोटाचे  भाग मानून त्यातील -
- भाग अन्न घन पदार्थ म्हणजेच पोळी, भाकरी, भात,भाजी असे खाएव.
- भाग द्रव पदार्थ म्हणजेच सूप,वरण, ताक, पाणी असे घ्यावे.
- भाग वायू संचारणासाठी, पचनासाठी,आवश्यक त्या हालचाली व्यवस्थित होण्यासाठी रिकामा ठेवावा.
याप्रकारे अन्न घेतल्यास गॅसेस, फुगारा, पोटदुखी, अपचन,आम्लपित्त, सारखे त्रास निर्माण होत नाहीत पचन उत्तमरीत्या होऊन प्राकृत आहाररस तयार होतो. या निरोगी आहाररसातून निरोगी शरीर मन घडते.

Stay healthy. Stay tuned.

No comments:

Post a Comment