Sunday, 14 May 2017

आरोग्यासाठी सोप्पे उपाय - आयुर्वेदातून आरोग्याकडे

१) जेवणास बसण्यापूर्वी हात पाय तोंड स्वच्छ धुवून पुसून घ्यावे.

२) कडकडून भूक लागलेली असतानाच जेवावे. उगीच वेळ झालीये म्हणून जेवण्यास बसू नये. तसेच पोटास तडस लागेपर्यंत जेवू नये.

३) जेवणाचा व स्वयंपाकाचा परिसर कायम स्वच्छ असावा. जेवताना मन प्रसन्न व आनंदी ठेवावे. tv कॉम्प्युटर, समोर बसून जेवण करू नये अशावेळी आपण किती खात आहोत याचा अंदाज येत नाही व बरेचदा अतिमात्रेत खाल्ले जाते.

४) शक्यतोवर ताजे बनवलेले जेवण घ्यावे. जेवण बनवल्यानंतर ३ तासांच्या आत जेवावे, म्हणजेच फ्रीझ मध्ये ठेवून गार केलेले अन्न जेवू नये. ऑफिस च्या वेळा व वेळेअभावी पूर्णवेळ शक्य नसेल तरी किमान न्याहारी (ब्रेकफास्ट) व रात्रीचे जेवण (डिनर) तरी या नियमानुसार घ्यावे.

५) जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात.विरुद्धान्न ( http://www.ayurbeej.in/2017/04/blog-post.html) डीप फ्रीझ अन्न, prepacked फळे किंवा अन्नपदार्थ खाऊ नये.

६) शक्य असलेली फळे कापून न खाता शक्यतोवर सालीसकट चावून चावून खावी. कापताना काही प्रमाणात त्यातील पोषकतत्वे नष्ट होतात. तसेच फळे, भाज्या कापून फ्रीझ मध्ये ठेवून देऊ नये, यामुळे देखील त्यातील पोषकांश नष्ट होतो.


७) पहिले अन्न पचल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये.

८) जेवणाच्या मधे थोडं थोडं पाणी प्यावे. जेवणाच्या एकदम आधी किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे पचनशक्ती मंद होते.

९) प्रत्येक घास चावून चावून खावा. तोंडातील घास पूर्ण संपेपर्यंत दुसरा घास घेऊ नये.

१०) एका वेळी जेवढा हवं  तेवढंच अन्न ताटात घ्यावे व ते पुर्ण संपवावे व जर पोट भरल्यासारखे नाही वाटले तर परत वाढून घ्यावे. यामुळे एकाच वेळी खूप खाणे होणार नाही व अन्न देखील वाया जाणार नाही.

११) जेवणात शक्यतोवर रोज ताकाचा वापर करावा.ताक हे उत्तम पाचक आहे. ऋतूंनुसार ताकाचा वापर -                               शीत ऋतू - सुंठ व मिरी घालून ताक घ्यावे.
                      वर्ष ऋतू - सैंधव घालून ताक घ्यावे.
                      ग्रीष्म ऋतू - साखर व पुदिना घालून ताक घ्यावे.

१२) सकाळचे जेवण १० - १२ च्या मध्ये व संध्याकाळचे जेवण ७.३० चा आत घ्यावे. यावेळी आपला जाठराग्नी प्रदीप्त असतो.

१३) आहारात unpolished डाळी व कडधान्यांचा वापर करावा.

१४) भोजन हे एका जागेवर बसून घ्यावे, खरेदीला मार्केटमध्ये गेल्यावर स्टॉल किंवा ठेल्यावरचे उघडे अन्नपदार्थ अस्वच्छ असतात, ते देखील खाऊ नये.

१५) हल्ली फॅशन म्हणून जेवताना कोकाकोला, थम्प्सअप , लेमोनेड सारखी अति शीतपेये घेण्याची पद्धत आहे. शीत गुणाचे तर आलेच पण या पेयांचा acidic Ph त्रासदायक असतो तसेच हे विरुद्धान्न आहे व याच्या अतिसेवनाने हाडे ठिसूळ होतात.

१६) जेवणाच्या शेवटी चहा कॉफी घेण्याची एक पद्धत आहे. या पेल्यातील टॅनिन चा अन्नातील आयर्न शी म्हणजेच लोहाशी संयोग होऊन तयार होणारे द्रव्य शरीरात शोषले जात नाही व हे लोह शोषले न गेल्यामुळे पांडू(anemia ) होतो.

१७) नियमित व्यायाम करावा. पण आधुनिक काळात व्यायाम न करणाऱ्या लोकांनी विरुद्धान्न (http://www.ayurbeej.in/2017/04/blog-post.html ) सेवन नक्कीच टाळावे.

No comments:

Post a Comment