आपल्या शरीराचे व मनाचे स्वास्थ्य हे आपण काय,कसे व किती खातो यावर अवलंबून असते. म्हणजेच स्वस्थ, विकाररहित शरीर व मनासाठी आहार हा सर्वात महत्वाचा घटक आहे.
आयुर्वेदाने या आहाराची महती पाच हजार वर्षांपूर्वीच जाणली होती व म्हणूनच आहाराचा समावेश निद्रा व ब्रह्मचर्य यांच्यासोबत त्रयोस्तंभात ( म्हणजेच निरोगी आयुष्यासाठी आवश्यक तीन स्तंभ/घटक ) केलेला आहे.
आहार काय असावा?
व्याख्या - आपण जे भक्षण करतो ( आहरण करतो ) त्याला आहार म्हणतात.
निसर्ग हा पंचभौतिक तत्वांनी बनलेला आहे तसेच आपले शरीरदेखील. म्हणूनच आहार देखील पंचभौतिक तत्वांनी युक्त असावा, म्हणजे तो शरीरात योग्यप्रकारे शोषला जाईल व शरीर मनाची निरोगी जडघडण होईल.