दिवाळी म्हंटली कि सगळयांना एक वेगळाच उत्साह संचारतो.
आकाशदिवे, रांगोळ्या, फटाके, फराळ, पुरणपोळी, इत्यादींची रेलचेल सुरु होते. पण या सर्व
धामधुमीमध्ये एका गोष्टीचा लहान मुलांना फार कंटाळा असतो आणि ते म्हणजे पहाटेचे
"अभ्यंगस्नान". फक्त लहानच काय तर आजकालची तरुणपिढीदेखील अभ्यंगस्नानास सासुरवास
अशा नजरेने बघतात. का बरे आपल्या पूर्वजांनी पहाटेच्या गारठ्यात उठून अंगाला तेल उटणे लावून स्नान करण्याचा हा प्रघात
घालून ठेवला असेल?
चला तर या अभ्यंगस्नानाचे वैज्ञानिकदृष्ट्या असणारे महत्व
जे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी ओळखून सांगून ठेवले आहे ते जाणून घेऊयात.
दिवाळी हा सण हिवाळ्यात (http://www.ayurbeej.in/2016/04/diet-and-lifestyle-as-per-ayurveda-in.html ) येतो. यावेळी वातावरणातील
शीतता (थंडपणा) वाढून त्वचा रुक्ष व कोरडी होते. यावेळी भेगा पडणे, त्वचा काळवंडणे,
खाज सुटणे, इत्यादी तक्रारी सुरु होतात. शरीरातील वात दोषाचे (वातदोषhttp://www.ayurbeej.in/2015/12/vata-dosha-leader-of-tridosha.html) प्राबल्य वाढू लागते, म्हणून या ऋतूत दिवाळी सणांतील
अभ्यंगस्नानास अत्यंत महत्व आहे.